भोकर:(दि.18जानेवारी)
भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ वानखेडे एका बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे टिपर वाहन चालू देण्यासाठी लाचेची मागनी केल्या प्रकरणी पडताळणी अंती व पंचा समक्ष निष्पन्न झाल्याने लोकसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार 5 जानेवारी 2022 रोजी पोलीस हवालदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे, वय 57 वर्ष, बकल नंबर 1767 यांची लाच मागणीची पडताळणी केली असता तक्रार देणाऱ्या बिल्डींग मटेरियल सप्लायरकडून त्याचे टिपर वाहन चालविण्याकरीता 3 हजार रुपयांची लाच घेतल्याची कबुली दिली. तसेच 13 हजार रुपये साहेबांचे व एक हजार रुपये स्वत:साठी लाचेची मागणी केली. या संदर्भाने अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अरुण सावंत, अमरावतीचे घटकप्रमुख पोलीस उपअधिक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संतोष इंगळे, पोलीस निरिक्षक अमोल कडू, पोलीस अंमलदार युवराज राठोड यांनी ही सापळा कार्यवाही नियोजित केली होती. परंतू भोकरचे पोलीस हवालदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे यांना संशय आल्याने त्यांनी ती 14 हजार रुपये रक्कम मागणीची लाच स्विकारली नाही. त्यामुळे आज 17 जानेवारी रोजी भोकर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रघुनाथ दिगंबर वानखेडे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments