भोकर: (दि.16 जानेवारी)
   रमेश गंगासागरे
     नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांनी भोसी सर्कल मधिल आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृहास मंजुरी दिली असुन हे सभागृह पांडुरणा येथे झाल्यास सर्वांना सोईचे होईल असे गावकरी बांधवांचे  म्हणने आहे.
       पांडुरणा हे गाव तालुक्यापासून जवळ असून ते आदिवासी पट्यातील परिसरातील गारगोटवाडी, समंदरवाडी,बोरवाडी, साळवाडी(डोरली) या गावांना सुधा जवळ आहे. म्हणून या सभागृहाचा सर्वांना याचा फायदा  होईल, असे मत मा. सभापती शिवाजी देवतुळे, समंदरवाडी मा. सरपंच माधवराव माझळकर यांनी म्हटले आहे. तर गारगोटवाडी येथील उपसरपंच टारपे यांचे म्हणणे आहे कि,  सभागृह हे समाजीक कार्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून  याच ठिकाणी व्हायला हवे. 
        १३ जानेवारी रोजी मा. जिल्हा आधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची पांडुरणा येथे भेट झाली, त्या वेळी जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः जागेची पाहणी केली होती. आणि जागा रोड टच व मध्यभागी असुन परिसरातील समाज बांधवांना योग्य राहिल असे मत  जिल्हाधिकारी महोदयांनी मांडले होते. जर परिसरातील सर्व समाज बांधवांना लाभ द्यायचा असेल तर मा. पालकमंत्री महोदयांनी योग्य जागेचा  निवाडा करून समाजहितासाठी चा निर्णय द्यावा अशी चर्चा परिसरातून होतांना दिसत आहे.