भोकर :(दि.27 जानेवारी
रमेश गंगासागरे
तालुक्यातील रेणापूर येथे वर्ल्ड व्हीजन इंडिया एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम भोकर च्या वतीने दिनांक 27 जानेवारी रोजी रेणापूर येथे बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली
गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरील बाल सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून बालाजी सिंगूरवाड तर उपाध्यक्ष , दत्तात्रय ढगे आणि सचिव जगदीश पप्पुलवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
वर्ल्डव्हीजन इंडिया या सामाजिक संस्थेचे कार्य हे अतिशय स्तुत्य असून आज पर्यंत संस्थेने भोकर तालुक्यात अनेक मौलाचे उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये आज रोजी रेणापूर येथे बाल सुरक्षा समितीचे कार्या याबाबत वर्ल्ड व्हिजनचे श्री प्रवीण गाडी साहेब यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अल्पवयीन बालकांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी समिती तयार करण्यात आली. प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंबंधा ने मार्गदर्शन करण्यात आले. शाळा,कॉलेज मध्ये अल्पवयीन मुला मुली सोबत रॅगिंग सारखे प्रकार घडू नयेत, त्यांच्यावर अत्याचार होऊ नये त्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये व गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, असा वर्ल्डव्हिजन या संस्थेचा उद्देश असून सदरचे काम करण्यासाठी ग्राम समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी या कमिटीमध्ये भोकर रुरल फार्मस प्रोड्युसर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे माधव सलगरे यांच्या पुढाकारातून बाल सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी वर्ल्ड व्हिजनचे प्रविण गाडे साहेब, उपसरपंच शामराव बिरगाळे, पोलीस पाटील श्रीराम सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश चंद्रकर, प्रदीप माने, दत्ता सिंगगुरवाड, शिवराम कोंडेवाड, जळबा टिळेकर, शिवाजी कोंडेवाड, राजेश मानपुरे, गजानन ढगे, डॉ. कैलास काणींदे, अशोक कावळे, तुकाराम पप्पुलवाड, यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.
0 Comments