भोकर :(दि.13 जानेवारी)
रमेश गंगासागरे
       भोकर शहर व तालुक्यांमध्ये दोन दिवसापासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत असल्याने लहान मुले व म्हातारी माणसांमध्ये आजही थंडीमुळे हुडहुडी कायम असल्याचे दिसून आले नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
       दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असून लहान मुले, वृद्ध यांना कफ, खोकला आणि सर्दी होत असल्याने दवाखाने तुडुंब भरले आहेत. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे तसेच पावसामुळे आंब्याचा मोहोर सुद्धा जळून गेल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत त्यामुळे भविष्यात आंब्याचे उत्पादन अल्प प्रमाणात होण्याची दाट शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.