भोकर :(दि.12 जानेवारी)
  रमेश गंगासागरे

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लामकानी केंद्र हाळदा तालुका भोकर येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का माधव जाधव हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान पटकावला आहे.
        शाळेतील एकूण चार विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी अनुष्का ही शिष्यवृत्तीधारक ठरली आहे.
भोकरचे गटशिक्षणाधिकारी डी. एस. मठपती यांच्या प्रेरणेतून covid-19 महामारीच्या काळातही शिक्षक श्री वाघाळकर, श्री माने, श्री कैरमकोंडा, श्री पवनकर यांनी मुख्याध्यापक श्रीरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली  अध्यापनासाठी अविरत प्रयत्न केले. अनुष्कानेही आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षक व आई वडिलांना दिले आहे.
       या यशाबद्दल पालक सभेमध्ये शाळा व पालकांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीरामवार हळदा संकुलाचे केंद्रप्रमुख श्री जोंधळे शिक्षण विस्तार अधिकारी श्री वाघमारे भोकर चे गटशिक्षणाधिकारी डॉ. मठपती यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.