नांदेड :(11 जानेवारी )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील नागापूर येथील उपसरपंच तथा प्रगतशील शेतकरी श्री, बालाजी पाटील शानमवाड यांना आज दिनांक 11 जानेवारी रोजी नांदेड येथे एका खास कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ.शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून विविध प्रकारची फळे, भाजीपाला उत्पादन करून भोकर तालुक्यामध्ये एक आदर्श शेतकरी म्हणून नावारूपास आलेले बालाजी पाटील हे सबंध भोकर तालुक्याला परिचित आहेत. दरवर्षी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून इतर शेतकर्पुढे आपला आदर्श बालाजी पाटील यांनी ठेवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी त्यांना जिल्हापरिषद उपकर योजना 20-21 चा डॉ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित केले, यावेळी विधानपरिषदेचे आमदार अमर भाऊ राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, कृषी सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शॉल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप असून बालाजी पाटील यांना पुरस्कार मिळण्यासाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय भोकरच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अनेक हितचिंतक व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोन करून आणि सोशल मीडिया वरून त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments