भोकर :(दि.1 जानेवारी)
रमेश गंगासागरे
भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील घंटलवार यांच्या रॉयल ईंनफिल्ड शोरूमचे आज दि.1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता आनंदराव लक्ष्मणराव घंटलवार आणि सुभाषराव लक्ष्मणराव घंटलवार यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले, यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आज सकाळी पूजा अर्चा करण्यात येऊन 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाट करण्यात आले. यावेळी भोकर शहरातील महेश पाटील यांची मित्रमंडळी, नातलग आणि अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. उद्घाटन प्रसंगी महेश पाटील म्हणाले की, भोकर तालुक्याच्या आसपास ईतर तालुक्यांमध्ये तरुणांच्या व नागरिकांच्या आवडीची मोटारसायकल म्हणून रॉयल एनफिल्ड ह्या मोटरसयकलकडे पाहिले जाते. ही मोटर सायकल खरेदी करण्यासाठी अनेक तरुणांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे, ह्या मोटरसायकलचा चाहतावर्ग भोकरसह ईतर तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांच्यासाठी आता भोकर शहरामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलचे भव्य शोरूम उभारण्यात आले असल्यामुळे, अनेक तरुणांना या ठिकाणी आपल्या आवडीच्या विविध आकर्षक रंगांमध्ये रॉयल एनफिल्डची बुलेट मोटारसायकल उपलब्ध होणार असल्याने त्यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा खर्च वाचनार आहे. असे ते यावेळी म्हणाले.
0 Comments