भोकर :(दि. 05.जानेवारी)
रमेश गंगासागरे
भोकर पोलीसानी मोटारसायकल चोरट्यांच्या विरोधात जोरदार पकड मोहीम उघडली असून 2 महिन्यात 3 मोटारसायकल चोर पकडून त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन भोकर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते याची गंभीर दखल घेवून पोलीस निरीक्षक, व्हि. एस. पाटील यांच्या नेतृत्वात पोहेकॉ/1776 दिलीप जाधव, पोहेकॉ/2215 माधव पाटील, नापोकॉ/988 व्यंकट आलेवार यांचे गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले होते वरील पथकानी आरोपी नामे शेख आयास शेख बरकत अली वय 30 वर्षे रा. के. आर. के. कॉलनी अदिलाबाद यास अटक करुन त्यास अधिक विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली देवुन चोरलेल्या (08) आठ मोटार सायकल किंमती 2,60,000/- (दोन लाख साठ हजार) रुपयाचे पोलीसाना काढून दिलेल्या आहेत.
त्यातील पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हा रजिस्टर नंबर 404/2021 कलम 379 भा.द.वि. मधील MH 26 AM 9919, पोलीस स्टेशन विमानतळ गुन्हा रजिस्टर नंबर 154/2021 कलम 379 भादवि मधील प्लेंडर प्रो क्रं. MH 26AY 9064, पोलीस स्टेशन भोकर गुन्हा रजिस्टर नंबर 416/2021 कलम 379 भादवि मधील ड्रीम युगा क्रं. MH 26AG 0630, पोलीस स्टेशन ईस्लापुर गुन्हा रजिस्टर नंबर 01/2022 कलम 379 भादवि मधील स्प्लेडर प्लस क्रं. MH 26 Y 4808, व तसेच तेलगांना राज्यातील म्हैसा, तामसा येथील 02 गाडया व इतर राज्यातील 02 गाडया जप्त करण्यात आलेल्या आहेत नमुद गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक, श्री विकास पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/1776 दिलीप जाधव पो.स्टे. भोकर हे करीत आहेत.
0 Comments