नवी दिल्ली : (21 जानेवारी)
रमेश गंगासागरे
काही दिवसांपासून युजर्स 5जी नेटवर्कची वाट पाहत होते. ही सेवा आता अमेरिकेत सुरू होत आहे.
5जी मुळे युजर्सला वेगवान इंटरनेटचा आनंद घेता येईल. पण, याच 5जी मुळे जगभरातील प्रवासी आणि विमान कंपन्यांची चिंता वाढली आहे. एअर इंडियाने त्यांचे अमेरिकेला जाणारे विमान रद्द केले. पण, आता ही विमानसेवा लवकरच पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. विमान निर्माता कंपनी बोइंगला त्यांच्या तपासणीत आढळले की ५जी नेटवर्कमुळे बोइंग ७७७ विमानाच्या टेलिमेट्रीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. फ्लाइट टेलीमेट्रीमधील त्रुटीमुळे, विमानाची स्वयंचलित यंत्रणा, उंचीचा अचूक अंदाज घेऊ शकत नाही. कोणत्याही वैमानिकासाठी योग्य उंचीच्या माहितीशिवाय विमान उतरवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळेच एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेला जाणारे बोइंग ७७७ विमान सध्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पशु,पक्षी आणि मानवी जिवणावरही या नेटवर्कचे गंभिर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे भविष्यात लवकरच याचे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणून ग्राहकांना 5 g पेक्षा 4g ची सेवा उत्तम प्रकारे द्यावी अशी मागणी होत आहे.
0 Comments