भोकर :(दि.14 जानेवारी )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील पाळज येथील तीर्थक्षेत्र श्री, गणपती मंदिराच्या विकासासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री, प्रताप पाटील चिखलीकर यांनी 5 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणल्याचे आजच्या दौऱ्यात सांगितले आहे. ते कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी मतदार संघात आले होते.
खा.चिखलीकर हे सकाळी प्रथम भोकर तालुक्यातील चिंचाळा येथिल माऊली पाटील यांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यानंतर 1 वाजता पाळज येथील कै.भूमना पप्पूलवार यांच्या घरी भेट दिल्यावर त्यांनी श्री, तीर्थक्षेत्र गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर लगेच देवस्थानच्या मंगल कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडलेल्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांनी दिलेल्या निवेदनाचा स्विकार केला. तिथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा व उपस्थित कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या सारख्या नवख्या माणसाला तुम्ही बहुमताने निवडून दिलात, त्यामुळे मी माझे कर्तव्य पार पाडत असून निवडून आल्याबरोबर पाळजला 50 लक्ष रुपयांचा निधी दिला होता, तर आता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. देवावर माझी अपार श्रद्धा असून मी वारकरी आहे. गळ्यात माळ आहे. देवाच्या दारी खोटे बोलणे मला जमणार नाही. ईथे तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मी मिळवून दिला आहे. काही लोकं सांगत आहेत, खोटा प्रचार करत आहेत की पर्यटनस्थळाचा दर्जा त्यांनी आणला आहे म्हणून. पण ते खोटे आहे. केंद्रामध्ये मी आहे विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर, गणेशराव कापसे बटाळकर, दिलीपराव सोनटक्के, जिल्हा परिषदेचे सदस्य दिवाकर रेड्डी, भाजपा विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, विशाल माने, श्रीकांत किन्हाळकर, चंद्रकांत नागमोड, जळबाजी पाटील जाधव किन्हाळकर, विठ्ठल पाटील कोळगावकर, गजानन ढगे नांदेड चे पत्रकार श्री,उमाटे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर खासदार चिखलीकर हे किनी येथील नाईक आणि भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य श्री दिवाकर रेड्डी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी देवठाणा ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उपस्थिती लावली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री राजू अंगरवार आणि ग्रामसेवक श्री,शंकर आलेवार यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामसेवक शंकर आलेवार म्हणाले की, गावात अजूनही काही विकास कामे करावयाची आहेत. तर काही कामे झाली आहेत, गावांमधील अजुनही विकास कामे करण्यासाठी खासदार निधीमधून थोडा निधी मिळाल्यास गावाचा विकास होण्यात मदत होईल त्यासाठी आपल्या स्थरावरून विकास निधी मंजूर करावा असे ते म्हणाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी भोकर येथील राम नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि नांदेडकडे प्रस्थान केले.
0 Comments