भोकर :(दि.7 जानेवारी)
    रमेश गंगासागरे
      विशेष सहाय योजने अंतर्गत भोकर तालुक्यातील संजय गांधी निराधार  अनुदान योजना व श्रावणबाळ योजना व इंगायो या योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक 30-12-2021 रोजी मा.तहसिलदार यांचे अध्यक्षते खाली संजय गांधी योजनेची बैठक घेण्यांत आली असून, सदर बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 25 अर्ज व श्रावणबाळ / इंगायो योजनेचे 12 अर्ज असे एकूण 37 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे 05 अर्ज व श्रावणबाळ / इंगायो 03 अर्ज असे एकुण 08 अर्ज नामंजुर करण्यात आलेले आहे.
        एकूण 45 अर्जावर संगायो बैठकीमध्ये निर्णय घेण्यांत आले आहेत. ज्या अर्जदाराचे अर्ज मंजूर आहेत त्या अर्जदारांना बॅक खाते किंवा पोस्ट ऑफीसचे खाते क्रमांक तहसिल कार्यालय, भोकर येथे सादर करण्याचे कळविण्यात आलेले आहे.