भोकर :(दि.10 जानेवारी)
रमेश गंगासागरे
भोकर येथे रात्री जेवणाचा कार्यक्रम आटोपून नांदेडकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कारला भिषण अपघात झाला असून यात 2 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे.
       घटनेबाबद मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, भोकर येथे सेवारत असलेले पो. कॉ. सुनिल सांभाळकर यांच्या घरी दि. 9 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या निमंत्रणावरुन दिपक देवानंद जाधव ब.नं. 3374 नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड सलंग्न कंट्रोल रूम, ईश्वर सुदाम राठोड ब.नं. 2727 नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड, प्रितेश ईटगाळकर ब.नं. 2853 व सदानंद सपकाळ ब.नं. 234 दोघांचीही नेमणूक पोलीस मुख्यालय भोकरचा मित्र सुनिल सांभाळकर रा.भोकर यांच्या शेतात जेवणाचा कार्यक्रम आटोपून. हे चारजण इंडिका कार क्र. एम.एच.26 व्ही. 1868 ने भोकरहून नांदेडकडे जात असतांना रात्री 9:00 वाजताच्या दरम्यान भोकर नांदेड महामार्गावरील मौ. खरबी ता. भोकर शिवारात रस्त्याने जाणाऱ्या ट्रक्टर क्र. एम. एच. 26 ए. आर. 1156 या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला मागून जोराने धडकली. या भीषण अपघातात कार मधील पोलीस कर्मचारी ईश्वर सुदाम राठोड व दिपक देवानंद जाधव, दोघेही नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड हे जागीच ठार झाले तर सदानंद सपकाळ व प्रितेश ईटगाळकर दोघेही नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
       सदरील अपघाताची माहिती मिळताच भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे, जमादार हनवते, चालक राजेश दुथडे व आदीजण तात्काळ घटनास्थळी पोहचले. काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी गंभीर जखमींना अधिक उपचारार्थ नांदेडला हलविले. तर उत्तरीय तपासणीसाठी मयतांचे प्रेत भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहनांच्या आजुबाजूला सुरक्षा व्यवस्था केली असून या प्रकरणी भोकर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.