भोकर :(15 जानेवारी)
रमेश गंगासागरे
भोकर शहरात कोविड लसीकरण सर्वेक्षण मोहीम शिक्षक, नगर परिषद,आरोग्य विभाग कडून राबविण्यात येणार आहे. वार्ड निहाय टिम तयार करून भोकर शहरातील शाळेतील शिक्षक व नगर परिषद कर्मचारी घरोघरी भेट देऊन वय वर्षे १५ ते १८ व वय वर्षे १८ वरील व्यक्तीनी कोविड लसीकरण करून घेतले आहे का? या बाबत सविस्तर माहिती घेणार आहेत.
त्या अनुषंगाने आज नगर परिषद भोकर येथे शिक्षक, नगर परीषद कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, ग्रा.रु.भोकर, प्रियंका टोंगे मुख्याधिकारी नगर परिषद भोकर, डॉ मठपती गटशिक्षणाधिकारी, मा.अनिल सिरसाट, मा.एम.जी.वाघमारे विस्तार अधिकारी, सत्यजीत टिप्रेसवार, पांडुरंग तम्मलवाड,जावेद ईनामदार, दत्ता अनंतवार, अशोक डोंगरे, मोरे, सचिन वैष्णव, रवी महाबळे, दिलीप कल्णाणकर, ज्ञानेश्वर श्रीरामवार आदी कर्मचारी उपस्थित कर्मचारी होते.
0 Comments