भोकर :(दि.17 जानेवारी)
रमेश गंगासागरे
परळीजवळ काल दि.16 रोजी सायंकाळी झालेल्या कार आघातात भोकरचे दोन तरुण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे.
तेलगाव- परळीकडून नांदेडकडे भरधाव वेगात येणारी स्वीफ्ट डिझायर कार बाभळीच्या झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान तेलगाव-परळी महाम मार्गावर तेलगाव येथेही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात गाडी पूर्ण चक्काचुर झाली मयत व जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शेख युसूफ शेख शादुल, सचिन मोकमपल्ले व अमोल वाघमारे (सर्व राहणार शहिद प्रफुल्लनगर, भोकर ) हे तीन तरूण रविवारी एम. एच. १३ सीके ०४४१ या स्वीफ्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगावमार्गे बीडला निघाले होते. तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबारजवळ सदर गाडी आली असता चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडलगत खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. गाडी एवढ्या जोरात धडकली की, गाडीची धडकेने दिशा पलटून गेली. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेले तरूण शेख युसूफ शेख शादुल व सचिन मोकमपल्ले हे जागीच ठार झाले. तर मागच्या सिटवर बसलेला तरूण दोन्ही सिट मध्ये अडकला, तो जखमी आहे. मयत व जखमी भोकरचे आहेत.
अपघात झाल्याचे समजताच तेथिल नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस कटरच्या मदतीने एका मयतास बाहेर काढण्यात आले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहाय्याने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. मयत व जखमींना १०८ रुग्ण वाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यामुळे एका जखमी तरूणाचा जीव वाचला.
0 Comments