भोकर :(दि.4 डिसें.)
  रमेश गंगासागरे

    महाराष्ट्र ज्ञान महामंडळ महाराष्ट्रातील ५ ते ९ वी वर्गात शिकत असलेल्या मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखण्या संदर्भात ही परीक्षा २००७ पासून घेत आहे. यावर्षी या परीक्षेत विशेष कोरोना पार्श्वभुमीवर काही महत्त्वाचे बदल करुन MSCIT  च्या केंद्रात कंप्यूटरवर ही परीक्षा घेण्यात येनार आहेत.
    या परीक्षेची विशेषतः म्हणजे विद्यार्थ्यांच्या  विविदांगी शैक्षणिक गुणवत्तेला आणि बुद्धीला आव्हान देणारे प्रश्न, एकच पेपर, सर्व विषय, प्रथम सत्राचा अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास संवाद - कौशल्य, मृदू कौशल्य, सामान्य ज्ञान, यावर आधारित ही परीक्षा राहणार आहे. काठीण्य पातळी आणि शैक्षणिक उद्दिष्टानुसार प्रत्येक प्रश्नाला वेगळे गुण देण्यात आले आहेत. दोन तासात जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचे चॅलेंज असून परीक्षेत अमर्याद प्रश्न उपलब्ध आहेत. बहुदिश विचार करण्यास प्रवृत्त करणारे, ज्ञानाचे उपयोजन, विषयांचा परस्पर संबंध लावून सोडविण्याचे प्रश्न, विचारांची आणि मनाची कवाडे उघडायला लावणारे प्रश्न, मुलांच्या भावविश्वातील प्रसंगांवर आधारित आव्हानात्मक प्रश्न, नवनवीन प्रश्न प्रकाराचा यात समावेश आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्याने सोडविलेल्या प्रश्नांनुसार शैक्षणिक उद्दीष्टांच्या पूर्ततेचा विषयवार अहवाल उपलब्ध होणार आहे. नोंदणी व परीक्षेची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२१ असून परीक्षा ४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ दरम्यान जवळच्या एमएस-सीआयटी केंद्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य स्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहेत.    तरी भोकर तालुक्यातील ५ वी ते ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी आमच्या MSCIT सेंटरला भेट द्यावी व या संधीचा फायदा घ्यावा, असे भोकर तालुका समन्वयक तथा दिशा  कॉम्प्युटर चे संस्थाचालक श्री, गायकवाड सर यांनी कळविले आहे.