भोकर :(दि.31 डिसें.)
रमेश गंगासागरे
भोकर शहरातील रस्ता दुभाजका मध्ये नागरिक आपल्या प्रतिष्ठानाचे फलक ठेवत असल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी चालकांना व पादचार्यांना दुसऱ्या बाजूचे वाहन दिसत नसल्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र भोकर शहरामध्ये दिसून येत आहे.
शहरातील वाहतुकी मध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने रस्ते रुंदीकरण करत असताना भविष्यात वाहतुकीची समस्या उद्भवू नये ही बाब लक्षात घेऊन, रस्ते मोठे करण्यात आले, तेव्हा शहरांमध्ये सगळीकडे रस्त्याबरोबरच दुभाजक काही टाकण्यात आले. पण या दुभाजकाला मध्ये नागरिक केरकचरा टाकून घाण करत आहेत तसेच आपल्या प्रतिष्ठानाचे मोठे मोठे नामफलक प्रसिद्धीसाठी ठेवत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे वाहन यामुळे नागरिकांना दिसत नाही. रस्ता ओलांडत असताना त्याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे. शहरातील विविध भागात फेरफटका मारला असता छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक, तहसीलच्या समोर, पंचायत समितीच्या समोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, किनवट रोड आदी भागात असलेल्या दुभाजक का मध्ये नागरिक आपल्या दुकानाचे नामफलक मोठ्या प्रमाणात ठेवत असल्याचे दिसून आले. आज दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या समोर एक नागरिक रस्ता ओलांडत असताना त्यास बोर्डा मुळे दुसऱ्य बाजूचे वाहन दिसले नाही, त्यामुळे त्याचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये त्यास किरकोळ दुखापत झाली व दुचाकीचे ही किरकोळ नुकसान झाले. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात घडू नये यासाठी भोकर नगरपरिषदेने दुभाजका मध्ये ठेवलेले नागरिकांचे नामफलक जप्त करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी भोकर विकास प्रेमी करत आहेत.
0 Comments