भोकर :(दि.9 डिसें.)
   रमेश गंगासागरे

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबर रोजी मुंबई येथे 
त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी देश विदेशातून लाखो अनुयायी येत असतात, त्याच अनुषंगाने ऑल इंडिया पॅंथर सेनेचे  संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार व त्यांचे शेकडो कार्यकर्ते  सुधा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते, त्यांनी कोणताही कायदा मोडला नाही, तसेच कोणतीही स्टंटबाजी केली नाही. शांततेच्या मार्गाने ते अभिवादन करण्यासाठी जात असतांना त्यांना मुंबई पोलिसांनी रोखले, त्यामुळे दिपकभाऊनी पोलिसांना जाऊ देण्याची विनंती केली. पण पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ न देता दंडेल शाही दाखवून त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. हे गैरकायदेशीर आहे. त्यांना तात्काळ सोडलेच पाहिजे अन्यथा तालुक्यात अचानक आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा ऑल इंडिया पॅंथर सेना शाखा भोकरच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज देण्यात आला असून निवेदनावर तालुकाध्यक्ष निखिल हंकारे, उपाध्यक्ष कुलदीप  तोडे, राजेश चंद्रे, योगेश गोरटकर,  गजानन ढोले, आकाश जिंदे, भैय्यासाहेब रोकडे, यांच्या सह्या असून यावेळी  ऑल इंडिया पँथर सेनेचे अनेक  पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.