भोकर :(दि.8 डिसेंबर)
   रमेश गंगासागरे

भोकर शहरातील तुंबलेल्या नाल्या दरवर्षी काढणे गरजेचे आहे पण मागील दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये भोकर नगरपरिषदेच्या वतने नालीतील गाळ काढलेला नसल्यामुळे आता शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नालीतील घाण पाणी साचत असल्याने रस्त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.
     नगरपरिषदेचा कार्यकाळ संपूर्ण जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे त्यामुळे भोकर नगर परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मुख्य अधिकारी प्रियंका टोंगे कारभार पाहत आहेत लवकर नगरपरिषद कार्यालयाकडे अनेक नागरिकांनी नालीतील गाळ काढून नाल्या साफ सफाई करण्यासाठी लेखी आणि तोंडी विनंती अनेक वेळा केल्याचे नागरिक सांगत आहेत पण नगरपरिषदेने ह्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच मागील अनेक दिवसापासून नाल्यात तुंबलेले असल्यामुळे नालीतील घाण पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे ह्या घाण पाण्यात मधूनच नागरिकांना आपली वाहने न्यावी लागत आहे तर वाहने नसलेल्या नागरिकांना घाण पाण्यामधून पाई जावे लागत आहे. त्यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले, व नागरिकांना या घाण पाण्याचा अतोनात त्रास होत आहे. मागील दोन वर्षांपासून भोकर शहरातील बसस्थानक लगत असलेल्या भीम टेकडी भागात याच पद्धतीने पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्याने तेथील नागरिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आज भोकर शहरातील काही भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, भोकर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात तळ्याचे स्वरूप आले होते, भोकर पोस्ट ऑफिस मधून गटारगंगा वाहत होती. भोकर शहराचे माजी सरपंच नारायण पाटील यांच्या घरासमोरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गटारगंगा वाहत असल्याचे निदर्शनास आले तसेच मुख्य चौकातून गटारगंगा जाऊन पवार कॉलनी मार्गे वाहत असल्याचे दिसून आले त्यामुळे नगरपरिषदेने कोरोणाची तिसरी लाट येण्यापूर्वी नाल्याची सफाई करावी अशी मागणी भोकर येथील भोकर विकास प्रेमी नागरिक करत असल्याचे दिसून आले.