रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील आमदरी येथे शनिवारी रात्री आलू ने भरलेला भरधाव ट्रक अचानक पेटल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यात मात्र जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे.
शनिवारी दि.18 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आलुने भरलेला एक ट्रक AP - 16 TC 9819 आमदारी जवळ येताच अचानक त्याच्या इंजिन मधून आगीचा धुराळा उडाला काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. गाडीतील किन्नर आणि चालकाने कसाबसा जीव वाचवत गाडीतून उड्या घेतल्या. हा ट्रक आल्लू घेऊन तेलंगणाकडे जात असल्याचे अनेक चालकांनी सांगितले पण भोकर जवळ ही दुर्दैवी घटना घडली. अंधार्या रात्री गाडीने पेट घेतल्यामुळे सर्वत्र लख्ख प्रकाश पसरला होता. भोकर नगर परिषदेच्या अग्निशमन दलास कोणीतरी इसमाने फोन करून सांगितल्यावरून अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन आग वीझ विण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. भररस्त्यावर ट्रक ने पेट घेतल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्याचे अनेक वाहन चालकांनी सांगितले.
0 Comments