भोकर :(दि.7 नोव्हेंबर)
    रमेश गंगासागरे

सगळीकडे ऑनलाईन लुटीचे प्रकार चालू असल्याने नेहमी सजग रहाण्याच्या सूचना दिल्या जात असतांनाही भोळ्या नागरिकांना लुटल्या जात आहे. भोकर शहरातील एका शासकीय नोकरदारास असेच 3 लाख रुपयाचे कर्ज तात्काळ देतो म्हणून त्याच्याकडून जवळपास 1 लक्ष 63 हजार रुपये काढून घेतल्याने खळबळ उडाली असून भोकर पोलिसांनी याबाबद गुन्हा दाखल करून तपास गतीमान केला आहे.
       घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, नगरपरिषद भोकर मध्ये कार्यरत असलेले कर्मचारी नामे गोरेमिया मनिमियाँ शेख यांना काही दिवसांपूर्वी मोबाईल वरून दिल्ली येथून एक कॉल आला, पुढील व्यक्तीने सांगितले की,मी चौधरी असून बजाज फायनान्स मधून बोलत आहे. तुम्हाला 3 लाखाचे कर्ज देण्यात आले असून त्यासाठी काही नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत. ते भरा व तात्काळ कर्ज घ्या. असे सांगितले, पुढील व्यक्तींनी गोरेमियाँ यांना आपले खाते नंबर पण दिला, आणि या खात्यात थोडीशी रक्कम भरावयास लावली. रक्कम तर थोडीच भरावयाचे आहे, त्या बदल्यात आपणास 3 लाख रुपये मिळणार या आशेने गोरे मीया यांनी पहिल्या दिवशी थोडी रक्कम भरली. तरी कर्ज मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील चौधरी नावाच्या व त्याच्या ऑफिस मधील ईतर 2 व्यक्तीला कॉल केला, व कर्ज मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावरून दिल्ली येथील व्यक्तीने थोडे काम शिल्लक आहे, पुन्हा काही रक्कम टाकल्यास आपल्याला तात्काळ कर्ज देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे भोकर येथून पुन्हा काही रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये टाकण्यात आली. असे करत असतानाच पुढील व्यक्तीची आशा वाढत गेली, त्यांनी गोरेमियाँ यांच्याकडून आपल्या खात्यामध्ये एका महिन्याच्या कालावधीत 1 लक्ष 63 हजारच्या वर रक्कम काढून घेतली. आणि कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे हताश झालेल्या गोरे मिया यांनी भोकर पोलीस स्टेशन गाठून सर्व आपबिती कथन केली. त्यामुळे भोकर पोलीस स्टेशन मध्ये पुढील व्यक्तीवर चौधरी नावाच्या व्यक्तीसह ईतर 2 व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील व्यक्तीचा शोध घेत आहेत.