भोकर :(दि.15 डिसें.)
रमेश गंगासागरे

       काल दिनांक 14 डिसें. रोजी भोकर शहरामध्ये पारधी समाजातील दोन गटांमध्ये उद्भवलेल्या वादानंतर त्यांनी एकमेकांवर वार करत तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक करून भोकर शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने यात कोणताही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त नाही पण पारध्यांची दहशत पाहून भोकर शहरातील नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते.
       सदरील घटना भोकर च्या मुख्य रस्त्यावर चालू होती सदरील घटना भोकर चे पोलीस निरीक्षक श्री काकडे यांना समजताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक श्री अनिल कांबळे यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले त्यांनी दहशत निर्माण करत असलेल्या पारध्यांना चारी बाजूने घेरुन 5 पुरुष व 6 महिला यांना अटक केली होती या सर्वांना भोकर येथील न्यायालयापुढे आज हजर केले असता, न्यायालयाने त्यातील महिलांना जामीन देऊन सर्व पुरुषांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भोकर शहरांमध्ये येऊन भोकर चे शांतता भंग करणाऱ्या पारध्यांना महाग पडल्याचे बोलले जात आहे.
       भोकर येथील पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल कांबळे हे काल दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी पारध्यांची दहशत चालू असताना आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जर वेळेवर पोहोचले नसते तर मात्र विपरीत घडले असते, अशी चर्चा भोकर शहरामध्ये सुजाण नागरिक करत आहेत. वेळेवर पोहोचून दंगल शांत करणार्‍या पोलिसांचे भोकरच्या नागरिकांमधून अभिनंदन केले जात आहे.