भोकर :(दि.6 डिसें.)
रमेश गंगासागरे
भोकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मधून मागील महिन्यात दिनांक 6 नोव्हेंबर रोजी एका नागरिकाची चोरी झालेली मोटरसायकल एका चोरासह मिळवण्यात भोकर पोलिसांना यश आले आहे.
घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोकर तालुक्यातील मौजे नारवाट येथे सुप्रसिद्ध असलेल्या गुड्डा महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हादगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील मोटार सायकल मालक श्री प्रकाश आडे हे आपली मोटारसायकल क्रमांक MH 26 बी जे 3909 हिरो होंडा कंपनीची गाडी गुड्डा महादेव परिसरामध्ये लावून देवाचे दर्शन घेण्यासाठी आत मध्ये गेले असता, दर्शन घेवून बाहेर आल्यावर त्यांना आपली गाडी त्या ठिकाणी दिसली नाही. गाडीचा दोन दिवस इतरत्र शोध घेतला असता मोटारसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून त्यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2021 रोजी भोकर पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. त्या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. व्ही. हनवते यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करत चोरीचा छडा लावण्यासाठी ज्येष्ठ पोलिस निरीक्षक श्री विकास पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक श्री कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई जाधव, पोलिस शिपाई देवकांबळे, पोलीस शिपाई आलेवाड त्यांना सोबत घेऊन चोराच्या मागावर जाऊन हिमायतनगर तालुक्यामध्ये प्रवेश केला. तेथे समजलेल्या माहितीवरून त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा या गावी असलेला मोटर सायकल चोर नामे परशुराम विश्वंभर मामीलवाड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील गाडी चोरली असल्याची कबुली दिली.व चोरीची गाडी ही सुधा नदीच्या परिसरात एका झडपा मध्ये असल्याचे त्यांनी सांगितल्यावरून पोलिसांनी ती गाडी सदरील घटनास्थळावरून जप्त केली आहे. मोटार सायकल चोरास पोलिसांनी आज दि.6 डिसेंबर रोजी भोकर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या मोटारसायकल चोरास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मोटारसायकल चोरीच्या घटनेचा तपास तात्काळ केल्याबद्दल नागरिकांमधून भोकर पोलिसांचे अभिनंदन होत आहे. अटक केलेल्या चोरांकडून आजूनही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0 Comments