नांदेड, (प्रतिनिधी) 
        भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दि. १ जानेवारी रोजी नांदेडच्या कल्याणनगर भागात विजयस्तंभाला सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे. 
            समता समाज संघाच्या वतीने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला समता समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास गरुड, राज्य उपाध्यक्ष दिगंबर मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कल्याणनगर सम्राट चौक, तरोडा बुद्रुक, कॅनल रोड इथं सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे मुख्य संयोजक इंजि. एस. पी. राके, अशोक वायवळ, निशांत सोने, चंद्रकांत सरपाते, सुधाकर सोनसळे, मारोतराव  चौदंते, यादवराव ढवळे, शंकरराव शिरसे, चंपतराव चिखलीकर, माधवराव झडते, प्रकाश कापुरे,जगन सरोदे, व्ही.के. वाघमारे, गोविंदराव जिंतुरकर, गायकवाड, जयराम सोनकांबळे, पी.के.कदम आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्य संयोजक, इंजि. एस. पी. राके  (9156017567) अशोक वायवळ, निशांत सोने, चंद्रकांत सरपाते, सुधाकर सोनसळे, मारोतराव  चौदंते, यादवराव ढवळे, शंकरराव शिरसे, चंपतराव चिखलीकर, माधवराव झडते, प्रकाश कापुरे,जगन सरोदे, व्ही.के. वाघमारे, गोविंदराव जिंतुरकर, गायकवाड, जयराम सोनकांबळे, पी.के. कदम हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.