भोकर तालुक्यातील भोसी येथील कैलास सरपाते यांचे चिरंजीव भानुदास सरपाते हे आय. आय. टी. कानपूर येथून इलेक्ट्रीकल इंजिनिअर झाले आहेत. एस.सी. प्रवर्गातून ते मेरिट लिस्ट मध्ये आले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून ते आज इंजिनिअर झाले आहेत. तसेच त्यांना एच.सी.एल. कंपनी मध्ये इंजिनिअर म्हणून तात्काळ नोकरी पण मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा भोसी येथे सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments