भोकर :(दि.18 डिसें.)
    रमेश गंगासागरे

       भोकर तालुक्यातील मौजे चिदगिरी येथे गावकऱ्याच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दत्त संस्थान मंदिरात मुख्य पुजारी श्री, दयाळगीर नारायनगिरी गीरी यांच्या शुभ हस्ते  दत्तात्रेची विधिवत पूजा करून टाळ मृदंगाच्या गजरात, गावाच्या मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली.
       सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये दत्तात्रेयची मूर्ती ठेवून या पालखीची गावातील प्रमुख रस्त्याने मिरवणुक काढण्यात आली. तसेच दत्त संस्थान मंदिराचे मुख्य पुजारी यांचे घरोघरी नागरिकांनी पूजा करून स्वागत केले. गावकर्‍यांनी मुख्य रस्त्यावर फुलांची चादर टाकून रस्ता सजवला होता तसेच अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी टाकून महाराजांचे व पालखीचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. पालखीच्या समोर टाळ-मृदंगाच्या आवाजात तसेच गावकऱ्यानी गायलेल्या भजनाच्या सुरात पालखी चालत होती. शेकडो महिला दत्त नामाचा गजर करत चालत होत्या, दुपारी ही पालखी दत्त संस्थानांमध्ये आल्यानंतर   दत्त जन्माचा कार्यक्रम करण्यात आला. संध्याकाळी गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, संबंध गावभर आज दत्त जयंती निमित्त भाविक वातावरण निर्माण झाले होते.