भोकर : (रमेश गंगासागरे )
भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री बालाजी पाटील यांचा वाढदिवस व्यंकटेश टॉकीज येथे दिनांक 02 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
भोकर येथील प्रफुल नगर मधील जुनी वेंकटेश टॉकीजचे मालक बालाजी पाटील यांचा काल दिनांक 2 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्या हितचिंतकांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सदरील वाढदिवसाचे आयोजन संभाजी धात्रक आणि अब्दुल शफी यांनी केले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये मुदखेड येथील नगरसेवक बालाजी गोडसे, पप्पू अण्णा बोलेवार, संजय पाटील मुरगुलवार, शेख आयुब, अब्दुल शफी, नवाब वसीम रफिक जुनेद मोहन शिपिरवार, गजू पाटील, संभाजी धात्रक, अक्षय गायकवाड, पेंटर दुधारे, राहुल कोंडलवार, शहाणे, गौतम कसबे, सुरेश कावळे, रमेश पाटील यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. तसेच दुपारी शासकीय विश्रामग्रह भोकर येथे सुद्धा त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.जुनी व्यंकटेश टॉकीज भोकर येथे पार पडलेल्या वाढदिवसाच्या या कार्यक्रमास मान्यवरासह , वकील, डॉक्टर, पत्रकार यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमांमध्ये भोकर येथील ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट भातलवंडे यांचासुद्धा वाढदिवस साजरा करण्यात आला.
0 Comments