भोकर :(दि.29डिसें.)
रमेश गंगासागरे
◆ भोकर मधील विविध संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन.
पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला व तिने आत्महत्या केल्याचा बनाव निर्माण करून तिचे प्रेत लटकवून ठेवले. त्या नराधमास तात्काळ फाशी देऊन मयत मुलीच्या कुटुंबास 50 लाखाची मदत देऊन पोलीस संवरक्षण देण्याची मागणी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद शाखा भोकर व भारतीय आदिवासी कोळी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय मोरे, कोळी महासंघ यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदारा मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, अत्याचारि पोलीस कर्मचारी विजय हटकरे यास बडतर्फ करून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावे. त्यानंतर त्यास फाशी शिक्षा देऊन मयत मुलीस न्याय मिळवून द्यावा, अन्यथा संबंध महाराष्ट्र भर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनामध्ये दिला असून निवेदनावर विजय मोरे, रमेश गंगासागरे, संदीप गंगासागरे, दत्ता बोईनवाड,(कोळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष नांदेड) संभाजी राचूटकर, बाबुराव तेलंगवाड, अशोक तुकाराम गायकवाड, श्याम बाबळे, यांच्यासह अनेक जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments