अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा द्या. - चर्मकार समाज बांधवांची एकमुखी मागणी.

 उमरखेड:(दि.28 डिसें.) 
     गजानन वानखेडे  

        नोकरीचे आमिष दाखवून चर्मकार समाजातील मुलीवर   अत्याचार करून तिला फाशी देऊन खून केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी हा पोलीस खात्यात नोकरीस असल्याने त्याच्या बचावासाठी अनेकजण पुढे येत असल्याचे कळते. 
     विजय हटकरे ह्या नराधम आरोपिने माणूसकीला काळीमा फासणारे वर्तन केले असल्याने, त्यास कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी ऊमरखेड तालुक्यातील चर्मकार बांधव एकत्र आले आहेत. 
       घटनेबाबद थोडक्यात माहिती अशी की, शहरातील वसंतनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या दंगल नियंत्रण पथकातील पोलिसाच्या घरात  २० वर्षीय मुलीचा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीवर अत्याचार करून मुलीस फासावर लटकविण्यात आल्याचा आरोप मृतक मुलीच्या वडिलाने पोलिसात दिलेल्या  तक्रार अर्जात  केला आहे. सदरील घटनेचे पडसाद संबंध महाराष्ट्र राज्यात उमटत असून अनेक संघटना व आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा ऊमरखेड, अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद यांनी  ऊपविभागिय अधिकारी तथा ऊपविभागिय दंडाधिकारी ऊमरखेड, चर्मकार विकास संघ यांच्यातर्फे नायब तहसिलदार काशिनाथ डांगे ऊमरखेड, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांना पोलीस स्टेशन ऊमरखेड यांच्याकडे करण्यात आली असून निवेदनावर हरीश पाचकोरे, दत्ता गंगासागर, भिमराव ईटकरे, डाँ.व्ही.एस.ईंगळे, गजाननवानखेडे, सुधाकर ईटकरे, महादेव खंदारे, विनोद पिंपरखेडे, कैलास ईटकरे आदी समस्त चर्मकार बांधवांनी सदर घटनेबद्दल रोष व्यक्त केला आहे. चर्मकार विकास संघ ऊमरखेड तालुका अध्यक्ष गजानन नारायण वानखेडे.(मरसुळकर), हरीभाऊ रामचंद्र खंदारे, सामाजिक कार्येकर्ते व पत्रकार यांनी दिले आहे.