नांदेड :(दि.21 डिसें.)
रमेश गंगासागरे
अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषद आयोजित ६ वे अ.भा. गुरु रविदास साहित्य संमेलन दिनांक २५ डीसेंबर २०२१ शनिवार रोजी नांदेड जिल्हयातील हदगाव तालुका येथील (गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात) सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत भरगच्य कार्यक्रमांच्या मेजवानीसह मोठया थाटामाटात संपन्न होणार आहे, तरी नांदेड जिल्हयातील बहुजनांसह चर्मकार बंधू-भगीणींनी लाभ घ्यावा असे अवाहन गुरु रविदास समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले आहे .
या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहीत्यीक तथा सिनेअभिनेते मा.सुभाष सोनवने (अहमदनगर) हे आसणार आहेत. तर उदघाटक म्हणून मुंबईचे माजी आ. बाबूरावजी माने यांची उपस्थीती राहणार आहे. या साहिल्य संमेलनाची सुरेख संकल्पना अ.भा.गुरु रविदास समता परीषदेचे संस्थापक तथा बहुजन नेतृत्व इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांची असून हदगाव नगरीच्या अनिता यादवराव उतकर आणि नागोराव गंगासागर हे स्वागताध्यक्ष आसणर आहेत.
या साहित्य संमेलनात प्रतिवर्षाप्रमाणे ग्रंथ मिरवणूक, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, कथाकथन, सांस्क्रतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, दिनदर्शिका प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन , पुस्तक प्रकाशन यासह भरगच्य वैचारीक कार्यक्रमांची मेजवानी आसणार असून या संमेलनाला देशभरातून मान्यवर विचारवंत , साहित्यीक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थीती राहणार आहे. प्रारंभी २४ रोजी शुक्रवारी सायंकाळी स्थानिक साहीत्यीक, लेखक, सर्व प्रींट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीया प्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नांदेड जिल्हयातील सर्व चर्मकार समाज बांधव तसेच बहुजन समाज बांधव यांनी उपस्थीती लावून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आव्हान जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे (ग्रामिण), विठलराव उकंडे (नांदेड शहर), महासचिव प्रकाशभाऊ कामळजकर, युवा जिल्हाध्यक्ष संतोष बोराळकर, हाणमंतराव उतकर, मनोज सुरजकर धर्माबाद, संतोष भालके मुखेड, संपादक रमेशभाऊ गंगासागरे भोकर आदींनी केले आहे .
0 Comments