हदगाव :(दि.25 डिसें.)
रमेश गंगासागरे

■ हदगाव येथे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन■
  आज दिनांक 25 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी  6 वे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे मोठया थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले.
     शनिवारी सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यानंतर गुरू रविदास मंगल कार्यालयामध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुभाष जी सोनवणे हे होते. चौथ्या सत्राचे समारोपप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक संभाजी सोनवणे म्हणाले की अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे चर्मकार समाजाच्या विचारांमध्ये मोठी भर पाडणारे संमेलन आहे पैनगंगेच्या तीरावर आणि शिखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या पावन झालेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन भरत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे असे ते म्हणाले चर्मकार समाज आम्ही न घाबरता जय रविदास आणि जय-भीम घालने जरूरीचे असल्याचे त्यांनी म्हटले आपल्या घरामध्ये देवी-देवतांचे फोटो ऐवजी महापुरुषांचे फोटो लावा म्हणजे आपल्या आणि भावी पिढीच्या विचारांमध्ये मोठी भर पडेल असे ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हराळे सर यांनी केले सदरील कार्यक्रमाला जिल्हाभरातून तसेच इतर जिल्ह्यांमधून असंख्य महिला-पुरुष सामील झाले होते. सदरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.