उमरी :(दि.23डिसें.)
  रमेश गंगासागरे
         नेहमी प्रमाणे शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी हे आपल्या घराकडून वाघलवाडा साखर कारखान्याकडे जात होते उमरी ते कारेगाव रोड वर विद्यार्थ्याने भरून जाणारा अँटो आणि मोटार सायकल यांची धडक बसली हे पाहताच प्रसंगावधान राखून कवळे गुरुजी धावत जाऊन रस्त्याच्या बाजूला पडणारा अँटो धरला आणि आतील विद्यार्थी बाहेर काढले आणि मार लागलेल्या व्यक्तीला आणि विद्यार्थ्यांना आपल्या गाडीत टाकून ग्रामीण रुग्णालय उमरी येथे उपचारासाठी दाखल केले तसेच काही अडचण पडल्यास मला फोन करा असा विश्वास त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या नातेवइकांना दिला.यावेळी सर्व विद्यार्थांनी कवळे गुरुजी यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपणारा सामाजिक कार्यकर्ता आणि संकटात सापडलेल्या साठी धावून जाणारा आपला हक्काचा माणूस आज सर्वांनी पाहिला.