कंधार :(दि.20डिसें.)
रमेश गंगासागरे 
                          नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी गावचे सुपुत्र जवान बालाजी डुबुकवाड हे  जम्मु कश्मिरमधील कुपवाडा येथे  १८ डिसेंबर रोजी शत्रूंशी दोन हात करत असतांना वीर मरण पत्करले होते. 
        भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (टी ए ) मराठा LI दलातील लान्स नायक बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना भारत मातेचे रक्षण करताना जम्मु कश्मीर (कुपवाडा) येथे  कर्तव्यावर असताना  वीरमरण आले त्याचा अंत्यविधी त्यांच्या मुळ गावी बाचोटी येथे  20 डीसेबर रोजी सायंकाळी पाच वाजता हजारों नागरिकांच्या उपस्थीतत  करण्यात आला.
           विरजवान बालाजी डुबुकवाड यांचे पार्थीव कंधार शहरात दुपारी 12 वाजता आले. कंधार शहरामध्ये खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  कंधार येथील खासदार कार्यालया समोर पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रद्धांजली वाहिली. त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष  हरीहरराव भोसीकर यांच्या कंधार येथील कार्यालया समोर पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रध्दाजली वाहीली. माजी सैनिक संघटनेचे  नादेड जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या सघटनेच्या वतीने  बसस्थानका जवळ पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रद्धांजली वाहाण्यात आली. कंधार पंचायत समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहाण्यात आली. श्री शिवाजी चौक येथे मोठ्या जनसमुदयाच्या उपस्थीतीत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी  पार्थीव्हाचे दर्शन घेवुन श्रद्धांजली वाहाली.  वीर जवानाची  अंतिम  याञा कंधार, बहादरपुरा, मानसपुरी  ते बाचोटी येथे दुपारी 3 वाजता पोहचली. विरजवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात शाशकीय ईतमामात करण्यात आला. यावेळी राज्याचे बाधकाम मंञी व नांदेड जिल्ह्याचे पालक मंञी ना. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. शामसुंदर शिदे, आ. अमर राजुरकर, आ. मोहन आण्णा हंबर्डे, माजी आ. शंकर आण्णा धोंडगे, माजी आ. रोहीदास चव्हाण, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, नादेड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वर्षा ठाकुर, नांदेड    पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, कंधारचे उपविभागिय अधिकारी शरद मंडलीक, कंधारचे तहसीलदार संतोष कामठेकर, लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बालाजी चुकलवाड, माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड, माजी जि.प.सदस्य संगिता धोंडगे, जि.प सदस्य अँड विजय धोंडगे, नगर पालीका माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगर सेवक मन्नान भाई चौधरी,  माजी जि.प. सदस्य. डाॅ. प्रा. पुरुषोतोम धोंडगे,  माजी आय.ए.एस. अधिकारी अनिल मोरे, वंचित बहुजन वंचित आघाडीचे नादेड जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, राजकुमार केकाटे, मधु पाटील डांगे,  गणेश कुंठेवार, भाजपा नादेड जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा शहर अध्यक्ष    गंगाप्रसाद येन्नावार, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड, सेवानिवृत कॅपटन संजय कदम, कॅपटन कपाळे, कॅपटन कस्तुरे, माजी सैनिक आयुब पठाण, ज्ञानेश्वर डुमणे, माजी सैनिक भगमान नागरगोजे, किशोर नरपञे, पोचिराम वाघमारे, अर्जुन कांबळे   यांच्यासह हजारो नागरीक विविध राजकिय पक्षातील कार्यकर्ते महिला उपस्थित होते. राज्याचे बांधकाममंञी आशोक चव्हाण व खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे आवर्जून उपस्थित होते. सर्व उपस्थित आमदार यांनी वीर जवान बालाजी डुबुकवाड यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजली वाहीली.  प्रथम सैन्य अधिकारी यांनी  सलामी दिली व नादेड पोलीसांच्या वतीने सुधा सलामी देण्यात आली.  विरजवान बालाजी डुबुकवाड यांचे छोटे भाऊ गंगाधर डुबुकवाड यांनी  पार्थिवास मुखाअग्नी दिला. यावेळी परीसरातील  हजारो नागरिक बालाजी दुबुकवाड अमर रहे,भारत माता की,जय च्या घोषणा देत होते.