भोकरः (दि.20 डिसें.)
         रमेश गंगासागरे  

येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत अभ्यास केंद्राच्या वतीने  बी.एस्सी. एम.एस्सी. एम.ए. एम. काँम. शिक्षणक्रमाच्या संपर्क सञाचे उदघाटन पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाँ. विकास सुकाळे  यांनी केले व या प्रसंगी  विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन  केले. 
        कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. संजय काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डाँ. सचिन तावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठा गिताने करण्यात आली होती. यावेळी मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बी.एस्सी.व एम.एस्सी. शिक्षणक्रमाची माहिती समन्वयक डाँ. सतीश चव्हाण  यांनी तर एम.काँम. शिक्षणक्रमाची विषयी माहिती डाँ. फोले कमल यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सुञसंचालन अभ्यास केंद्र संयोजक डाँ. राधाकिशन होगे यांनी केले.तर सर्वाचे आभार साजीद कुरेशी यांनी मानले.कार्यक्रमाला संमञक म्हणून डाँ. प्रशांत तावडे. , प्रा. उमेश माकोडे  उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र साह्यक प्रल्हाद सुर्यवंशी , बांदे लिंगारेड्डी  यांनी प्रयत्न केले. सदरील संपर्क सञात विद्यार्थ्यांच्या अनेक अडीअडचणी , परीक्षा मुल्यांकन पध्दती यावर मार्गदर्शन करण्यात आले.