रमेश गंगासागरे
परवाच उद्घाटन झालेल्या शहरातील नवीन उड्डाणपुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोनी पार्किंगची सोय करून घेतली असून याच उड्डाणपुलावरून अवजड वाहतूक ये-जा करत असल्याने नागरिकांची चिंता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
भोकर शहरातून नांदेडकडे जाणार्या रस्त्यावर परवाच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन केले होते, या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, हा पूल अवजड वाहनांसाठी उपयोगात आणू नये. पण येथील कर्मचारी अशोक चव्हाण यांनी केलेल्या आव्हाना कडे दुर्लक्ष करत असून, या उड्डाण पुलावरून दररोज असंख्य अवजड वाहने ये-जा करत आहेत. तसेच आज गुरुवारी प्रवासी वाहतूक करणारे असंख्य प्रवासी ऑटो अवैद्य प्रवासी वाहनतळ पुलावरच केल्याचे दिसून आले. त्यामुळे आगोदरच अरुंद पूल अन त्यावर वाहन तळ निर्माण झाल्यामुळे काही अप्रिय घटना घडण्यापूर्वी, वाहनतळाची ईतर ठिकाणी व्यवस्था करून अवजड वाहनांना प्रतिबंध करावा. अशी मागणी नागरिक करतांना दिसून येत आहेत.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments