कंधार :(26 डिसें.)
 रमेश गंगासागरे

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील जवान बालाजी श्रीराम डूबुकवाड हे शहीद झाले आहेत.
       जमू काश्मीर येथिल कुपवाडा येथे भारत मातेचे रक्षण करत असताना त्यांना वीर मरण आले,
ते मूळचे कंधार तालुक्यातील बाचोटी येथील रहिवासी असून सामान्य कुटुंबातील आहेत. लहानपणापासूनच त्यांना सैन्यामध्ये भरती होऊन भारत मातेची सेवा करण्याची इच्छा त्यांनी मनात बाळगली होती त्यांना वीर मरण आल्याची वार्ता नांदेड जिल्ह्यामध्ये पसरताच संबंध नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी व भारतीयांनी त्यांना सोशल मीडिया वरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
       बालाजी डुबूकवाड यांना भोकर न्यूज लाईव्ह परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.