उमरी :(18 डिसें.)
 गंगाधर  सवई  

   उमरी तालुक्यातील गोरठा या गावी आनंद बुद्ध विहार येथे दि.१९डिसेंबर रविवारी सकाळी ९,३० वा. तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या मुर्तीची स्थापना पुज्य भंते शिलरत्न सहयोग नगर नादेड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून याच वेळी बुद्धविहार लोकार्पण सोहळा माजी आ. बापुसाहेब गोरठेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते होणार आहे.       
      तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती उमरी शहरातील अन्नदाते व शासकीय गुत्तेदार संजीव विठ्ठलराव सवई यांनी दान दिल्या आहेत. गोरठा येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायधिश तथा जिल्हाध्यक्ष यशवंतराव चावरे, यांच्या हस्ते पचशिल ध्वजारोहण होणार आहे, तसेच निळा ध्वजारोहण महेंद्र गंगाधर हातोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तसेच आनंद बुद्ध विहार लोकापण स़ोहळा ठीक १०:१५ वाजता. लाडके माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या शुभ हस्ते सपन्न होईल. सदरील आनंद बुद्ध विहाराचे कोनशिला समारंभाचे उद्धघाटण सोहळा मा.शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर (उपसभापती (प.स.उमरी) तसेच नादेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (संचालक नादेड) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई सोनकांबळे (सभापती, प.स.उमरी) ऍड.भाऊसाहेब देशमुख (मा.सभापती) सुभाषराव देशमुख, दासराव देशमुख गोरठकर, (तहसीलदार माधवराव बोथीकर) उमरी पो.स्टे.चे.पोलीस निरीक्षक मोहनराव भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ, माधव विभुते. इत्यादी उपस्थित राहणार आहेत,  प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवीकिरण जोधळे (सहशिक्षक, भा,बौ,म,नादेड) सा,ना,भालेराव (भा,बौ,म,कोषाध्यक्ष, नादेड) प्राचार्य ए,एस,जाधव, भा,बौ,म,जि,स, उपाध्यक्ष, नादेड, गंगाधर सवाई ,(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तथा पत्रकार) भीमराव वाघमारे, भा,बौ,स,उ,ता, अध्यक्ष,बि,एस,सरोदे, भा,ब,स,भोकर यांचे मार्गदर्शन लाभनार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून ईश्वर विठ्ठलराव सवाई (नगरसेवक, नगर परिषद उमरी,) स्वरूपा माघव सुर्यवंशी, सरपंच, ग्रामपंचायत गोरठा, भागीरथा रमेश पालदेवाड, उपसरपंच, गोरठा, डोगरे,सर (कवी,लेखक) यशवंत, क्षिरसागर, मा,भा,बौ, स,उमरी, सुरेश मनमते (कार्यकर्ते पळसगाव) सतीश झडते, भा,बौ, म,स, को,उमरी, दत्तात्रय तुपसाखरे मा,स,कैलास सावत, शंकर सोनकांबळे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत, सायंकाळी ठीक,८ वा. सुप्रसिद्ध गायक बुद्धिवंत आडाव, संजय आडाव, यांच्या भिम - बुद्ध, गितांचा जंगी सामना ठेवण्यात आला असल्याचे संयोजक आनंद बुद्ध विहार समीती गोरठा यांनी कळविले आहे.