भोकर :(दि.17 डिसें.)
   रमेश गंगासागरे

        स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षे निमित्त, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन एच एम) अंतर्गत भव्य महाआरोग्य, दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा (ऑपरेशन) शिबीर  दिनांक १४.१२.२०२१ ते १७.१२.२०२१ या कालावधीत उपसंचालक डॉ. एकनाथ माले लातुर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर नांदेड, डॉ अन्सारी नोडल अधिकारी शिबीर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय , भोकर येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य, दंतचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीरात १६०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून शस्त्रक्रियेस पात्र असलेल्या रुग्णाचे ऑपरेशन करण्यात आले या शिबीरात ५० मोठ्या शस्त्रक्रिया (२३ हायड्रोसील , १९ हार्निया , ०३ अँपेन्डीक्स , ०४ मुळव्याध, ०१ सिझरेन सेक्शन ) व १३१ लहान शस्त्रक्रिया अशा एकूण १८१ शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय भोकर येथेच करण्यात आल्या. तसेच नेत्र रुग्णांची तपासणी करुन ५५ नेत्र रुग्णांना कॅटॅरॅक्ट सर्जरीसाठी श्री गुरु गोविंदसिंघ मेमोरियल हॉस्पीटल, नांदेड येथे पाठविण्यांत आले . सदरील शिबीरात १३२ रुग्णांची सोनोग्राफी, ९३ रुग्णांचे एक्सरे, २०१ रुग्णांची ईसीजी व ५०० च्या वर रुग्णांच्या प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यात आल्या . या शिबीरात जिल्हास्तरावरील व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील तज्ञ डॉक्टर यांनी सेवा दिली. रुग्णांची शस्त्रक्रिया डॉ . दिलीप फुगारे, डॉ. उत्तम वागतकर, डॉ. माधव विभूते , डॉ. पाटोदेकर, डॉ. जुबेरी, डॉ. नाईक, डॉ. पावडे पी.जी. यांनी केल्या व डॉ इंगळे दंतचिकित्सक व त्यांची टिम,भूलतज्ञ म्हणुन डॉ. केंद्रे, डॉ . बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ. अनंत चव्हाण, डॉ. पवार, डॉ. जाधव, डॉ. शितल पानझडे, डॉ. अस्मिता भालके, डॉ राजाराम कोळेकर इत्यादी तज्ञ डॉक्टर यांनी सेवा दिली. सदरिल शिबीर यशस्वी करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय, भोकर येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे व या रुग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, प्रतिनियुक्तीवर आलेले कनिष्ठ लिपिक, परिसेविका, अधिपरीचारीका, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, ईसीजी तंतज्ञ, महालँब, शिपाई, कक्षसेवक, अधिकारी व कर्मचारी तसेच हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, किनी, उमरी धर्माबाद येथील कर्मचारी व नर्सिगचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले.