भोकर :(दि.13डिसें.)
रमेश गंगासागरे
भोकर येथील मोंढा भागातील प्रतिष्ठित व्यापारी श्री वेंकटेश पोकलवार यांचा वाढदिवस आज साधेपणाने त्यांच्या मित्रांच्या वतीने साजरा करण्यात आला.
भोकर शहरातील प्रसिद्ध उद्योजक व व्यापारी म्हणून व्यंकटेश पोकलवाड यांच्याकडे पाहिले जाते ते भोकर शहरातील सुप्रसिद्ध मंगल कार्यालय ओम लॉन्सचे मालक सुद्धा आहेत. तसेच भोकर शहरातील किनवट रोड वरील व्यंकटेश्वरा टाईल्स अँड ग्रॅनाईट ह्या प्रतिष्ठानाचे सुद्धा मालक आहेत. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावाचे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आज 13 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याकरणाने त्यांचे मित्र, आप्तेष्ट, आणि हितचिंतक हे सोशल मीडिया फेसबुक, व्हाट्सअप आणि प्रत्यक्षरीत्या फोन करून त्यांच्यावर वाढदिवसाचा वर्षाव करत आहेत. आज दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या किनवट रोड येथील व्यंकटेश्वरा टाइल्स अँड ग्रॅनाईट प्रतिष्ठानमध्ये भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक श्री रमेश जी. गंगासागरे, नांदेड येथील प्रतिष्ठित व्यापारी उमेश परडे, शुभम कामडी, बालाजी शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाचा केक कापून व पुष्पहार टाकून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
0 Comments