भोकर :(दि. 2 डिसेंबर)
    रमेश गंगासागरे

        भोकर तालुक्यातील मौजे कांडली येथील ग्रामपंचायत शाशकीय निधी अनियमितपणे उचलून अपहार केल्या संदर्भातील पंचायत समिती भोकर येथील गटविकास अधिकारी राठोड यांना सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.         तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतच्या तक्रारीं आता येण्यास सुरुवात झाली असून, नागरिक जागरूक झाल्याचे चित्र दिसत आहे, कुठे ग्रामसभा नाही,तर कुठे मासिक सभा घेतली जात नाही. तर कुठे विद्यमान सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे निवेदन भोकर पंचायत समिती कडे येत आहेत. आता कांडली  ग्रामपंचायतीत ग्रामसेवक  भारती हे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा विश्वासात न घेता  दि.२१/०६/२०२१ ते दि. ६/०९/२०२१ या कालावधीत एकूण १०, ५,१२४/- एवढी रक्कम अनियमितपणे उचलून अपहार केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील रक्कम गावातील विकास कामासाठी वापरण्यात आली असल्याचे ग्रामसेवकाने सांगीतले. मात्र प्रत्यक्षात कुठेही एक छदामही न वापरता अपहार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरील ग्रामसेवकाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान 'महोदयांनी' सदरील रक्कमा उचलताना विद्यमान सरपंचास कुठलीही कल्पना न देता त्यांची स्वाक्षरी न घेता अपहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावर गटविकास अधिकारी अमित राठोड हे कोणता निर्णय घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.