भोकर :(दि.30 डिसें.)
रमेश गंगासागरे
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो जास्तकाळ पोलिसापासून लपून राहू शकत नाही, ऐकना एक दिवस तो पोलिसांच्या हाती लागतोच याचे ज्वलंत उदाहरण भोकर मध्ये पहावयास मिळाले.
घटनेबाबद थोडक्यात माहिती अशी की, मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन भोकर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते याची गंभीर दखल घेवून पोलीस निरीक्षक श्री, विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक,श्री अनिक कांबळे यांच्या नेतृत्वात पोहेको/ 1776 दिलीप जाधव, नापोकॉ/988 आलेवार, पोकॉ/2867 खेडकर यांचे गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले होते. वरील पथकानी मागिल महिन्यात आरोपी नामे अनिल उत्तम गवारे रा. बळीरामपुर यास अटक केली होती, त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून चोरलेल्या 11 मोटार सायकल किंमती 550000/- (साडेपाच लाख रुपये) रुपयाचे पोलीसाना काढुन दिलेल्या आहेत.
चोरीतील 8 मोटार सायकल पोलीस स्टेशन भोकर येथील गुन्हयातील आहेत. तसेच मागील महिन्यात आरोपी नामे बाबु मामीलवार रा. टाकराळा यास सुध्दा अटक करून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून 5 मोटार सायकल किंमती 250000/- (आडीच लाख) रुपयाच्या गाड्या दिलेल्या आहेत. त्यातील मोटार सायकल पोलीस स्टेशन भोकर येथील गुन्हयातील आहेत. व उर्वरीत मोटार सायकल मालकाचा शोध घेणे चालु आहे.
पोलीस स्टेशन भोकर येथील मागील 2 महिन्यात 2 आरोपी अटक करून त्यांचेकडे एकुण 800000/- रुपयाचा (आठ लाख रुपये) मुदेमाल भोकर पोलिसांनी जप्त केलेला आहे. पोलीस स्टेशन भोकर येथे एकुण 18 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन त्यापेकी 14 मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असुन सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की. आपल्या चोरीला गेलेल्या वाहनाची ओळख पटवुन पोलीस स्टेशन भोकर येथुन घेवुन जावे. असे आव्हान पोलीस निरीक्षक श्री, विकास पाटील यांनी केले आहे. अधिक तपास PSI अनिल कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/1776 दिलीप जाधव, पोना/988 आलेवार, पोकॉ/2867 खेडकर हे करीत आहेत.
0 Comments