भोकर : (दि.8 डिसें.)
  रमेश गंगासागरे 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम) अंतर्गत मोफत भव्य महाआरोग्य, दंतचिकित्सा व शल्यचिकित्या (ऑपरेशन) शिबीर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तपासणी करून निवड झालेल्या रुग्णांची दि. १५ ते १७ डिसेंबर या दरम्यान आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डॉ एकनाथ माले उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांच्या संयोजनाने व मार्गदर्शनुसार महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. सदरील शिबीरामध्ये तज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर्स फिजीशियन, सर्जन, स्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक, नाक कान घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गुरू गोविंदसिंघजी रुग्णालय नांदेड, आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टर्स कडून वैद्यकीय रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, ऱ्हदयविकार, तपासणी करण्यात येणार आहे.
हायड्रोसील (अंडवृद्धी), हर्नीया, अपेंडीक्स, गर्भ पिशवीच्या कँन्सरचे निदान व पुढील उपचार,शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया व शालेय मुलांच्या नियोजित शस्त्रक्रिया या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. भोकर, मुदखेड, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग तर्फे करण्यात आले. सदरील महा आरोग्य शिबीरा निमित्त पुर्व तयारी आढावा बैठक आज दि. ७ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेण्यात आली. डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ अन्सारी नईमुलहई प्रशासकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी महाआरोग्य शिबीर, डॉ.एच.के. साखरे वैद्यकीय अधिकारी, दत्तात्रय सवादे अर्थसंकल्पीय अधिकारी, एनएचएम नांदेड यांनी पुर्व तयारी आढावा बैठक घेतली. डॉ. अशोक मुंडे व डॉ अन्सारी यांनी महाआरोग्य शिबीराचे नियोजन, जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करणे या बाबत व शिबीर यशस्वी रित्या संपन्न करण्या बाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बाळासाहेब बिऱ्हाडे,डॉ अनंत चव्हाण भुलतज्ञ,डॉ माधव विभुते स्रीरोग तज्ञ, डॉ. सागर रेड्डी, डॉ सारीका जेवळीकर  बालरोगतज्ञ, डॉ. राजाराम कोळेकर दंतचिकित्सक, डॉ. व्यंकटेश टाकळकर, डॉ. अविनाश गुंडाळे, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती यन्नावार, डॉ मुद्दशीर, डॉ. विजयालक्ष्मी किनीकर, डॉ विनायक थोरवट, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य सहाय्यक हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, गंगामोहन शिंदे औषध निर्माण अधिकारी, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा कनिष्ठ लिपिक, श्रीमती सुचिता नवघडे परीसेविका, जीजा भवरे, संगिता महादळे, निलोफर पठाण,छाया बोड्डेवाड, ज्योती शेंडगे,दिपके, डवरे अधिपरीचारीका, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अलि, मल्हार मोरे, संदीप ठाकूर, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, श्रीमती मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड, सरस्वती दिवटे आरोग्य सेविका, बत्तलवाड, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र, रामराव जाधव, इंदल चव्हाण क्षेत्र कर्मचारी,सुनील चरण, गोविंद मेंडके, ज्योती काळे, गायकवाड, कदम आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.