उमरी : ( 11 नोव्हेंबर )
गंगाधर सवई
उमरी शहरातील रापतवार नगर येथे लुंबिनी बुद्ध विहारात दि.7 नोव्हेंबर रोजी बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात आली असून त्याच दिवशी बुद्ध आणी त्याचा धम्म ग्रंथाची सांगता करण्यात आली आहे.या वेळी भन्ते विनय बौद्धीप्रिय बोलत होते.
दानशुर व्यक्तीमत्व असलेले संजीव विठ्ठलराव सवई यांच्या निवास स्थानी तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्ती आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थाना पासुन लुबिनी बुद्ध विहारा पर्यत मिरवणूक काढून मुर्ती स्थापना करण्यात आले .
या कार्यक्रमात प्रारंभी कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते नविन बुद्ध विहार चे व भन्तेजीच्या निवासस्थाचे लोकापर्ण सोहळा व उदघाटन करण्यात आले त्या नंतर भन्ते विनय बौद्धीप्रिय यांच्या हस्ते बुद्धमुर्ती व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती प्रतिष्ठापणा करण्यात आले. प्रस्ताविक गंगाधर सवई यांनी केले. यावेळी भन्ते विनय बौद्धप्रिय यानी प्रवचणास उपदेश देताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिला त्या पविञ धम्मात वावरत असतांना धम्माच्या नियमाचे आचरण करणे काळाची गरज आहे. बौद्ध धम्माला कलंक लागेल असे वागू नये, जुन्या चालीरिती, गुलामी, अंधश्रद्धा लाथाडून पंचशिलाचे आचरण करा, एक चांगला बौद्ध धम्माला साजेल असा मानुस बना इतर धर्मातील लोकाना तुमचा आर्दश वाटले पाहीजे असे संस्कारमय जिवन जगा. सदाचारी सदगुणी मानसाची संगत धरा, वाईटाचा त्याग करा. प्रज्ञा न्याय आणी सत्यसंगती हाच बौद्ध जिवणाचा मार्ग होय. त्या मार्गाने चला असा संदेश भन्ते विनय बौद्धप्रिय यांनी आपल्या प्रवचनातून धम्म देशना देताना दिला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास देशमुख गोरठेकर तर प्रमुख पाहुने म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रविणभाऊ सारडा, नगरसेवक ईश्वर सवई, सदाशिव पुपुलवाड, नगराध्यक्ष सदानंद खांडरे, नगरसेविका अनुसयाबाई कटकदवने, राजेश जाधव, ए.एस जाधव सर, भिमराव वाघमारे, के.एन .पवार, गंगाधर जोधंळे, सुरेश हानवते, सतिश झडते, डी.जी. तुपसाखरे राजू सवई, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजनाबाई सवई, विजयाबाई लोखंडे, महामाया सवई, रेखाबाई हनवते, वंदना सवई, शेषाबाई वाघमारे, पार्वतीबाई सवई, लक्ष्मीबाई झडते, अश्वीनीबाई सवई, कपील जोधंळे, माधव डोंगरे, सुरेश सवई, धोडींबा सवई , दत्ता लोखंडे, प्रतिभा सवई, त्रिरत्न सवई, मिलींद सवई, भिमराव सवई, गंगाधर मदने, हौसाजी बामने, संतोष डोगंरे, ईश्वर लोखंडे, शेषेराव हानवते आदीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल वाघमारे यांनी केले तर आभार भिमराव सवई यांनी मानले.
0 Comments