भोकर :(दि.15नोव्हेंबर)
     रमेश गंगासागरे

भोकर तालुक्यातील मौजे आमदरी वाडी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 140 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
       आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश वागतकर आणि काशिनाथ मेंडके यांच्या हस्ते करण्यात येऊन जयंतीची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश गजानन वागतकर हे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी जंगलामध्ये अनेक वर्ष राहून  गनिमीकव्याने स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांशी लढा दिला. आणि खरे देश प्रेम दाखवले त्यांचा आदर्श नवतरुण मंडळींनी घेण्यासारखा आहे. असे ते म्हणाले. सदरील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बालाजी मेंडके संदीप बोथींगे, राजाराम मेंडके, एडवोकेट प्रकाश मेंडके, बालाजी बोथींगे, सुभाष बोथींगे, शिवाजी मेंडके, संतोष वागतकर, गोविंद देशमुखे, गजानन डाके, विजयकुमार मेंडके, उकाजी बोथींगे, यांच्यासह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजकुमार वागतकर यांनी केले, प्रास्ताविक बालाजी बोथींगे यांनी केले तर आभार बालाजी मेंडके यांनी मानले.