भोकर:(दि.8नोव्हेंबर)
 रमेश जी.गंगासागरे

नागरिकांनी भरलेल्या करा मधून गावातील विविध प्रकारची विकास कामे करून गावचा विकास साध्य करता येतो असे प्रतिपादन पाटोदा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सेवा समर्पण परिवार व दैनिक पुढारी आयोजित सरपंच परिषदेमधील खेड्याकडे चला मधिल द्वितीय  सत्रात केले. ते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण व अनुभवी वक्ते होते.
       दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भोकर येथे ओम लॉन्स मंगल कार्यालयामध्ये भोकर येथील सेवा समर्पण परिवार आणि दैनिक पुढारीने आयोजित केलेल्या सरपंच परिषदेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दिवाकर रेड्डी, प्रकाश देशमुख भोसीकर, शिवराज सागर, दै. पुढारीचे उपसंपादक पत्रकार अमृत देशमुख, राजेश्‍वर रेड्डी लोकावाड, उत्तमबन महाराज, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवा समर्पण परिवारांच्या तीकास, फावडे, कुदळ आणि झाडू या साहित्यांची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दुसऱ्या सत्रात पुढे बोलतांना पेरे पाटील म्हणाले की, माझ्या ग्रामपंचायत मधील नियोजनबद्ध कार्यामुळे आज माझ्या गावचे नाव संबध भारतभर पोचले आहे. गाव सुधारण्यासाठी व गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहन्यासाठी त्यांनी उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांना कानमंत्र दिला. पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या. गावात झाडे लावा पण फळांची लावा जेणेकरून त्याचा उपयोग सावली, फळे, ऑक्सिजन, व गाव सुंदर दिसण्यासाठी झाला पाहिजे. आणि गावातील निराधार लोकांनवर दया करावी. माझ्या गावात माझी ग्रामपंचायत 38 निराधार  लोकांची सेवा करत असून त्यांना आम्ही दत्तक घेतले आहे. पाऊस पडण्यासाठी गावात हरिनामसप्त ची गरज नसून वृक्ष लागवडीची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे. हे गावच्या यशाचे गमक त्यांनी हासत व खेळीमेळीच्या वातावरण सांगितले. कार्यक्रमास भोकर तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक, ग्रामसेविका सरपंच यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्‍वर रेड्डी यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक नारायण कुमरे यांनी केले तर आभार प्राध्यापक बालाजी काळवणे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा समर्पण परिवारातील 32 सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते हे विशेष. भोकर तालुक्यामध्ये ही पहिलीच सरपंच परिषद असल्याने ह्या सरपंच परिषदेची जिल्ह्यात  जोरदार चर्चा होत आहे.