भोकर :(दि.11 नोव्हेंबर)
रमेश गंगासागरे
भोकर येथील सेवा समर्पण परिवाराचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाव्हा येथील मुख्याध्यापक श्री बालाजी तूमवाड यांनी लिहिलेल्या "तूका झाला खोटा" या कवितासंग्रहाचे रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भोकर येथील कैलास गडावर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
शिक्षकी पेशा सांभाळत ज्ञानार्जनाचे कार्य करून आपला छंद जोपासणे फार कमी लोकांना जमते, यस अपवाद वगळता मुख्याध्यापक बालाजी तुमवाड यांनी ज्ञानार्जनाचे कार्य करत असताना आपला छंद जोपासून मोठा कवितासंग्रह तयार केला असून या कवितासंग्रहाचे प्रकाशन 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मा.श्री इंद्रजीत भालेराव ज्येष्ठ साहित्यिक परभणी यांच्या शुभहस्ते होत असून सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य हे राहणार आहेत. ह्या कार्यक्रमास महंत उत्तमबन महाराज श्री दत्त संस्थान भोकर, मा.श्री मारोतराव कवळे गुरुजी उद्दोजक, मा.श्री राजेंद्र खंदारे उपविभागीय अधिकारी भोकर, मा.श्री बाळासाहेब रावणगावकर सभापती जिल्हा परिषद नांदेड, श्री राजेश लांडगे तहसीलदार भोकर, श्री व्यंकटेश चौधरी साहित्यिक नांदेड, तसेच श्री निर्मलकुमार सूर्यवंशी निर्मल प्रकाशन नांदेड, यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार असल्याचे सेवा समर्पण परिवार भोकने कळविले आहे.
0 Comments