भोकर :(दि.8 नोव्हेंबर)
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील मौजे रेनापुर येथील विद्यमान ग्रामसेवक श्री आर.आर विजापूरे हे मागील अनेक वर्षापासून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वावरत आहेत ते सध्या गावात कोणत्याच प्रकारे कामे करत नसल्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी अखेर दिनांक 08 नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी भोकर यांच्याकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून ग्रामसेवक विजापुरे यांची इतरस्त्र बदली करून गावाला कर्तव्यदक्ष ग्रामसेवक देण्याची मागणी केली आहे.
विजापुरे यांची रेनापुर येथून बदली करण्यासंदर्भात गावातील 256 नागरिकांनी सह्यांचे निवेदन वरिष्ठाकडे दिले असून निवेदनामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की मौजे रेणापूर येथील निष्क्रिय ग्रामसेवक आर आर विजापुरे यांची तात्काळ बदली करून दुसरा ग्रामसेवक द्यावा निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की विजापुरे यांच्यावर मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून रेणापूर येथे कर्तव्यावर कार्यरत असून त्यांनी गावांमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्यावर गावकऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत गावकऱ्यांच्या तक्रारी मुळे त्यांच्या अनेक वेळा चौकशा झाले असून निकाल प्रलंबित आहे आठ महिन्यांपूर्वी नवीन ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यापासून ते सतत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत रेनापुर ग्रामपंचायतला शासनाचा निधी आलेला असूनही त्यांनी निधी न वापरता मनमानी करत आहेत त्यांना कामाबाबत विचारणा केली असता ते उलट गावकर्याना मी काय तुमचा नोकर आहे का? अशा स्वरूपाच्या धमक्या देत आहेत. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह म्हणून अशा निष्क्रिय ग्रामसेवकाची मौजे रेनापुर येथून तात्काळ बदली करून ह्या ठिकाणी नवीन कर्तव्यदक्ष ग्रामसेवक द्यावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर, यांच्याकडे सदबा गोविंदराव बिरगाळे, सिद्धार्थ रामराव कावळे, सुनील चांदराव सलगरे, डॉ. कैलास गणपतराव कांनिदे, सटवा मारोती जंगवार, सचिन दगडुजी दनतूलवार, पांडुरंग बालाजी बिरगाळे, गोविंदराव सदबा बिरगाळे, यांच्यासह शेकडो नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. आता वरिष्ठ या निवेदनावर कोणती भूमिका घेतात हे पाहणेच योग्य ठरेल.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
0 Comments