भोकर :(दि.24 नोव्हेंबर)
     रमेश गंगासागरे

       सरकार आणि नागरिक यांच्यामधील व्यवहारात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाची इंटरनेट सेवा मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने खरेदी-विक्री व्यवहार ठप्प पडले आहेत.
       दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत नागरिक व शेतकरी हे अनेक प्रकारचा व्यवहार करत असतात शेती विकणे, शेती खरेदी करणे, दानपत्र करणे, मालमत्ता हस्तांतरण करणे, वाटणी पत्र करणे, गहान पत्र, बक्षीस पत्र करणे, यासह विविध पद्धतीची कामे या कार्यालयामार्फत चालत असल्याने सरकारला झालेल्या व्यवहारांमध्ये लाखो रुपयांचा महसूल दर दिवशी मिळत असतो. मागील काही दिवसापासून भोकर येथील नवीन उड्डाणपुलाजवळ बी एस एन एल चे वायर तुटल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. त्याचा परिणाम खरेदी विक्री व्यवहारावर मोठ्या प्रमाणात झाला असून, खरेदी-विक्री व्यवहार करणारे नागरिक मोठ्या अडचणींमध्ये सापडले आहेत. तर शासनाचा दररोजचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत दुय्यम निबंधक चे अधिकारी श्री धोंडगे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, एक दिवस चालू आणि चार दिवस इंटरनेट सेवा बंद असते आम्ही वरिष्ठांना याबाबत तोंडी कळविले आहे, पण ते ईकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. असे ते म्हणाले आमच्या प्रतिनिधीने नांदेड येथील सह. जिल्हा निबंधक श्री बोराळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी अधिकचे बोलणे झाले नसल्याने जास्तीची माहिती मिळू शकली नाही. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह मागील वर्षभरापासून कोरोणा काळामध्ये सुद्धा व्यवहार बंद असल्यामुळे तालुक्यातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत, त्यामुळे बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद करून दुसऱ्या ईतर कंपनीची इंटरनेट सेवा घ्यावी व व्यवहार सुरळीत करावेत, अशी अनेक नागरिकांनी मागणी केली आहे. वरिष्ठांना तोंडी ऐवजी जर लेखी स्वरूपात कळवले असते तर आज इंटरनेट सेवा चालू होऊन व्यवहार सुरू झाले असते, अशी चर्चा खरेदी-विक्री व्यवहार करणारे नागरिक करत आहेत.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा