भोकर : (दि. 21 नोव्हेंबर)
रमेश गंगासागरे
ऑल इंडिया पँथर सेना नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान गौरव महोत्सवास मोठ्या संख्येने नागरिकांनी येऊन कार्यक्रम यशस्वी करावा असें आव्हान ऑल इंडिया पँथर सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष निखिल हंकारे यांनी केले आहे.
नांदेड येथील छत्रपती चौक पूर्णा रोड नांदेड येथे दि.26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:15 वा. भव्य संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून या कार्यक्रमात संविधानाची प्रत व प्रास्ताविकाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भोकर तालुक्यातील तमाम बहुजन समाजाने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आव्हान ऑल इंडिया पँथर सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष निखिल हंकारे यांनी केले आहे.
0 Comments