भोकर :(दि.17 नोव्हेंबर)
    रमेश गंगासागरे

      छावा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री शंकर पाटील बोरगावकर यांच्याकडून भोकर येथील पत्रकारांचा राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून यथोचित सत्कार करण्यात आला.
         16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन असल्याकारणाने सगळीकडून सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून हितचिंतक यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर पाटील बोरगावकर यांनी शासकीय विश्रामगृहात दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पत्रकारांचा यथोचित सत्कार केला. शंकर पाटील हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून ते छावा संघटनेमार्फत भोकर तालुक्यात व नांदेड जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्य करून युवकांच्या ह्रदयामध्ये स्थान मिळविले आहे. ते  नेहमीच सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊन अनेक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत आहेत. मागील काही दिवसापूर्वी  त्यांच्या वाढदिवसादिनी सुद्धा पत्रकारांना "समई" सप्रेम भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला होता हे विशेष. शंकर पाटील बोरगावकर यांच्यासोबत, छावा संघटनेचे विठ्ठल पाटील कोल्हटकर, बाळू पाटील कदम, दत्ता लोणे आणि जितेंद्र जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी भोकर शहर व तालुक्यातील असंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.