भोकर :(दि.15नोव्हेंबर)
   रमेश गंगासागरे

           गेल्या 18 दिवसापासून महाराष्ट्र एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण करून संपावर आहेत आता हळूहळू हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करत असून संघटनेच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
       एसटी चे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या आपल्या कुटुंबातील मुलाबाळांसह भोकर st आगारापासून  भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन भोकर चे तहसीलदार श्री लांडगे त्यांना सादर केले सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान एस टी सागरापासून सर्व कर्मचारी मुख्य मार्गाने मोर्चा काढून तसेच विविध मागण्या संदर्भात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुले मोर्चाचे मुख्य आकर्षण बनले होते त्यांच्या हातामधील विविध मागण्यांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते मोर्चा तहसील कार्यालयावर येताच सर्वप्रथम न्याय हक्कासाठी लढा देत 34 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. असली कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना भोकर येथील यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे, आदिवासी संघटनेचे गंगाधर वानोळे, मनसेचे माधव मेकेवाड, आकाश गेंटेवार, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, भाजपाचे प्रकाश पाटील कोंडलवाड, गणेश कापसे,  चंद्रकांत नागमोड, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, एमआयएम चे माजी तालुकाध्यक्ष जुनेद पटेल, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे, यांनी जाहीर पाठिंबा देऊन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वाहक सौ. कांबळे, हेड मेकॅनिक मोरे, एसटी कर्मचाऱ्यांचे चिरंजीव मंगेश दिलीप कांबळे आणि सुदर्शन राठोड या मुलांनी आपल्या जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह कार्यक्रमानंतर तहसीलदार श्री लांडगे यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार चालक शेख ताजोद्दीन त्यांनी केले. मोर्चात शेकडो एसटी कर्मचारी बांधव,भगिनी  शांततेच्या मार्गाने सामील झाले होते मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री, कांबळे, श्री तांबोळी यांच्यासह असंख्य पोलिस बांधवांनी बंदोबस्त लावला होता.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा